ऑल द बेस्ट! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

ऑल द बेस्ट! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

  • Share this:

 SSC-HSC-exams

28 फेब्रुवारी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे.

राज्यातील एकूण 9 हजार 143 ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी यंदा ही परीक्षा देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील 2 हजार 710 केंद्रांवर ही परीक्षा होईल.

दरम्यान, गेल्यावर्षी बारावी परीक्षे दरम्यान बुक किपींग या विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेत व्हॉटस अॅपवर आढळून आला होता. याची गंभीर दखल घेत यंदा परीक्षा केंद्रातील परिक्षकांना मोबाइल बंदीचा निर्णय बोर्डातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाची सक्तीची अंमलबजावणी करण्याची सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 09:24 AM IST

ताज्या बातम्या