आता सेना अशी वाटचाल करेल की बाळासाहेबांना अभिमान वाटेल -उद्धव ठाकरे

आता सेना अशी वाटचाल करेल की बाळासाहेबांना अभिमान वाटेल -उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_thackery27 फेब्रुवारी : शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली, पण यापुढे शिवसेना अशी वाटचाल करेल की बाळासाहेबांनाही त्याचा सार्थ अभिमान वाटेल असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी केलंय.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवसेनेने आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय. यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सत्ता स्थापनेसाठी फिरतायत मात्र अशात देशाकडे कोण लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारलाय. त्यासोबतच देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्यदलाचा पेपरच फुटत असेल तर मग देशाचं संरक्षण कशा हातात आहे ते आपल्या लक्षात येईल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2017, 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading