मराठा आरक्षणाची सुनावणी कोर्टात की समितीपुढे ? -हायकोर्ट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2017 09:34 PM IST

Ekmaratha_highcourt27 फेब्रुवारी : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय मुंबई उच्च न्यायालयात चालावयाचा की राज्य सरकारने स्थापन केलेल्या कमिशनसमोर हे २९ मार्चपर्यंत ठरवून न्यायालयाला कळवावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज या विषयावर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र मूळ याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे आणि अजय पारस्कर यांनी नुकतंच ४ जानेवारी २०१७ रोजी निवृत्त न्यायाधिश एस. बी. म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कमिशनबाबत अभ्यास करायचा असल्याने 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्याची मागणी केली.

हे कमिशन मराठा आरक्षणाबाबत अहवाल तयार करून तो न्यायालयाला सुपूर्द करणार आहे. त्यानुसार न्यायालयाने निर्णय घ्यावा अशी मागणी याचिकार्त्यांनी केली. अखेर याबाबत कमिशन निर्णय घेणार की आम्ही घ्यावा ते आम्हाला कळवा अशी भूमिका न्यायालयाने घेतलीय. दरम्यान, या वळणावर येऊन कमिशन स्थापन करण्याचा निर्णय घेणं म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप अन्य याचिकाकर्त्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...