S M L

नगरसेवकपद लॉटरी नाही,मुख्यमंत्र्यांनी टोचले नवनिर्वाचित नगरसेवकांचे कान

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2017 08:57 PM IST

  नगरसेवकपद लॉटरी नाही,मुख्यमंत्र्यांनी टोचले नवनिर्वाचित नगरसेवकांचे कान

27 फेब्रुवारी : काही जागा कमी आहेत, आणखी एक दोन जागा जरी कमी असत्या तरी फरक पडला नसता. पण आपली दिशा ठरली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना ठणकावून सांगितलं. तसंच नगरसेवक झालो म्हणजे लाॅटरी लागली असा गैरसमज करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कान टोचले.

नवनिर्वाचित नगरसेवकांना आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं.  पक्षामुळेच तुमचं अस्तित्व आहे पक्षाला विसरलात तर घात झालाच म्हणून समजा असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्र्यानी दिलाय. नगरसेवक झालो म्हणजे लॉटरी लागली असा अनेकांचा समज आहे  पण असं काही नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर लढले असते तर वेगळं चित्र असतं असंही ते म्हणाले. जनतेनं भाजपला मुंबईत कौल दिलाय, भाजपची लढाई विचारांशी आहे. लोकांना पारदर्शक कारभार हवा आहे लोकांनी तसा कौल दिलाय  असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 08:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close