तब्बल 17 तासांनंतर हार्बर लाईन ट्रॅकवर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2017 12:09 AM IST

तब्बल 17 तासांनंतर हार्बर लाईन ट्रॅकवर

harbour_line27 फेब्रुवारी : मुंबई उपनगरीय रेल्वेचा हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल 17 तासांनंतर सुरळीत झाली.  पावणे नऊ वाजता सीएसटी ते कुर्ला हार्बर लाईनवरून पहिली लोकल सुटली. तर कुर्ला ते वाशी दरम्यान 7 च्या दरम्यान धिम्या गतीनं वाहतूक सुरू झाली होती.

आज सकाळी जीटीबी स्थानकाजवळ एक मालगाडी रूळावरून घसरली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. संध्याकाळपर्यंत मालगाडीचे घसरलेले डब्बे हटवण्याचं काम सुरू होतं.  सकाळी वाहतूक कोंडीमुळे पनवेलवरून निघालेल्या गाड्या कुर्ल्यापर्यंतच सोडण्यात आल्या. त्यामुळे ठिकठिकाणी स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली.

काही जणांना चेंबूर ते कुर्ला अशी तीन एक किलोमीटरची रूळावरून पायपीट करावी लागली. मानखुर्दनंतर लोकल्स ठिकठिकाणी थांबत थांबत कुर्ल्याला पोहोचत होत्या. त्यामुळे पनवेलवरून निघालेल्या मुंबईकरला कुर्ल्याला पोहोचायला दोन एक तास लागले. हार्बर रेल्वे मार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला ऐन संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. 15 तासांच्या अघोषित मेगाब्लाॅकनंतर  कुर्ला ते वाशी दरम्यान धिम्या गतीनं वाहतूक सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...