S M L

कशी असणार शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती ?

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2017 07:57 PM IST

 कशी असणार शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती ?

उदय जाधव,मुंबई.  

27 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौर निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत सध्या शिवसेनेला करावी लागतेय. अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा तर शिवसेनेनं मिळालाय. पण महापालिकेत शिवसेने समोर, सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते भाजपचं...तसेच इतर समित्यांवर शिवसेनेचा अध्यक्ष निवडून आणण्याची कारामतही शिवसेनेला करावी लागणार आहे. कशी असणार आहे शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी रणनिती याबद्दलचा एक रिपोर्ट.

शिवसेना यापुढे कुणाशीच युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी निवडणुआधी घोषित केलं होतं. पण निकालानंतर युतीशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झालीय. मुंबई महापालिकेत महापौर निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्टं बहुमत मिळालेलं नाहीय. त्यामुळे शिवसेनेला अपक्ष आणि इतर पक्षांची मोट बांधावी लागणार आहे.


मुंबई महापालिकेत काँग्रेसनं महापौर पदासाठी उमेदवार उभा केल्यास काँग्रेसची निर्णायक मतं फक्तं काँग्रेसच्या उमेदवारालाच मिळतील. जेणेकरून शिवसनेचा महापौर निवडून आणण्याचा मार्ग मोकळा होईल. तसं नाही झालं तर काँग्रेस कुणला पाठिंबा देणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

शिवसेनेनं महापौर निवडून आणण्यात यश मिळवलं तरी स्थायी समिती आणि इतर समित्यांवर अध्यक्ष निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसंच जे प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येतील तेव्हाही शिवसेनेला भाजपच्या संख्याबळाचा सामना करावा लागणार आहे. या सर्व परीस्थितीशी शिवसेना कशी दोन हात करणार, यावरच यापुढे मुंबई महापालिकेत रणसंग्राम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 07:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close