राज्यात बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठणार ?

  • Share this:

bailgada27 फेब्रुवारी : बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात याबद्दलचं विधेयक आणलं जाणार आहे. बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्यासाठी सरकारदरबारी आता हालचाली सुरू करण्यात आल्यायत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दलचं विधेयक आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी विधी आणि न्याय विभागाला दिलेत. या विधेयकाद्वारे राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करायला परवानगी देण्यात येणार आहे. तामिळनाडूमधल्या जल्लीकट्टूप्रमाणेच बैलगाडा शर्यतींवरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. जल्लीकट्टूसाठी तामिळनाडूत आंदोलन झाल्यानंतर सरकारने अध्यादेश काढून जल्लीकट्टूला परवानगी दिली.

जल्लीकट्टूवरची बंदी उठवल्यानंतर बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवा, अशी मागणी राज्यातही सुरू झालीय. बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवावी यासाठी कामकाज सल्लागार समितीमध्ये विधेयक आणा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला दिलेत. यानुसार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक आणण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 06:22 PM IST

ताज्या बातम्या