महापौर बंगल्याच्या जागेतच होणार बाळासाहेबांचं स्मारक

महापौर बंगल्याच्या जागेतच होणार बाळासाहेबांचं स्मारक

  • Share this:

 

mayor bunglow

27 फेब्रुवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासस्थानाची जागा देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय. मुंबई महापालिकेतल्या जुन्या नगरसेवकांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. याच दिवशी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबई महापालिकेचे नवीन महापौर जिजामाता उद्यानातल्या सरकारी निवासस्थानी राहायला जातील.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला महापौर निवासस्थानाची जागा देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मांडण्यात आला. यापूर्वी या प्रस्तावाला सुधार समितीने आचारसंहितेच्या आधी मंजुरी दिली होती. आज कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापौर बंगल्याची जागा १ रुपये एवढ्या नाममात्र दराने 30 वर्षांसाठी स्मारकाच्या ट्रस्टला देण्यात येणार आहे. राज्य सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ही जागा द्यायला आधीच मान्यता दिली होती.

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारू, असं भाजपने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख नाही, अशी टीका भाजपने केली होती. पण बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक जाहीरनाम्यात नसलं तरी ते उभारण्याची आमची इच्छा आहेच, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. आता मात्र निवडणुकीनंतर बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम मार्गी लागलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...