पवार बिनचिपळ्याचा सदा नारद, केशवराव धोंडगेंचा मुका आणि टीका

पवार बिनचिपळ्याचा सदा नारद, केशवराव धोंडगेंचा मुका आणि टीका

  • Share this:

dhondge_pawar27 फेब्रुवारी : राजकीय नेत्यांनाही भावना असतात आणि त्या वेळोवेळी व्यक्तही होतात. असाच काहीसा प्रसंग घडलाय तो नांदेडमध्ये..शरद पवारांना प्रेमानं जवळ घेऊन मुका घेतलाय तो शेकापचे नेते आणि एकेकाळची महाराष्ट्राची बुलंद तोफ केशवराव धोंडगेंनी.

नांदेडमध्ये पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सवी अभिनंदन सोहळा पार पडला. त्यात भाई केशवराव धोंडगेंनी अगोदर भेटता क्षणी कौतुकानं मुका घेतला आणि नंतर धोंडगे बोलायला लागले त्यावेळेस त्यांच्यातली तोफ धडाडायला लागली.  बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतींना गिळून घेणारा असा हा पठ्ठ्या (शरद पवार) राजकारणात अजरामर झालाय. कलापती आहे, छत्रपती आहे कळपतीसुद्धा आहे..कळ वगैरे काढणारा नारद नाही..तो नारद केसं वाढलेला, हातात चिपळ्या घेतलेला आहे...पण पवार हे बिनचिपळ्याचा सदा नारद आहे अशी टोलेबाजी धोंडगेंनी केली. तसंच  ही बारामती (शरद पवार) अशी आहे. माझ्या जावायाला फोडलं, निजामराव पाटील यांना फोडलं. पण मला याचा पत्ताच लागला नाही. त्यांच्या घरावर होता लालबावटा आणि तो निघाला आणि राष्ट्रवादीची झेंडा लागला असा हा जादूगार आहे असं कौतुकही धोंडगेंनी केलं.

धोंडगेंच्या टोलेबाजीवर शरद पवारांनी आपल्या भाषणात चांगलाच षटकार लगावला. धोंडगेंची तोफ एवढं धडाडली की थांबत नाही आणि जवळ घेतलं तर सोडत नाही असा चिमटा पवारांनी काढला. ते पुढे म्हणाले. व्यासपीठावर आल्या आल्या त्यांनी माझा मुका घेतला त्याचा वळ अजूनही गालावर उमटलाय. आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणून बरं आहे. नाहीतर उद्या सकाळी घरी गेल्यावर सांगावं लागेल दुसऱ्या कुणी नाही तो केशव धोंडगेंनी घेतला असं सांगत एकच सभामंडप हश्या आणि टाळ्यांनी कडाडून गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2017, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading