शिवसेनेनं काँग्रेसशी अभद्र युती करू नये -चंद्रकांत पाटील

शिवसेनेनं काँग्रेसशी अभद्र युती करू नये -चंद्रकांत पाटील

  • Share this:

chandrakant_patil427 फेब्रुवारी : शिवसेनेनं काँग्रेसशी अभद्र युती करू नये असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केलंय. शिवसेनेचा भाजप हा नैसर्गिक मित्र आहे याची आठवणही चंद्रकांत पाटील यांनी करुन दिलीये.

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी अजूनही युतीबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा युतीबद्दल भूमिका मांडलीये.  आपण दोन्हीही नैसर्गिक पक्ष आहोत. नैसर्गिक मैत्री भाजपशी होऊ शकते, त्याशिवाय कोणता पर्याय नाहीये असं पाटील यांनी म्हटलंय. तसंच काँग्रेससोबत अभद्र युती करू नये.  जर अशी युती झाल्यास सामान्य जनतेलाही ते आवडणार नाही असंही पाटील म्हणालेत. सामनातून होणाऱ्या टीकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2017, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading