आॅस्करमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम अभिनेत्याचा गौरव

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2017 03:46 PM IST

आॅस्करमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम अभिनेत्याचा गौरव

ali oscar winner muslim

२७ फेब्रुवारी : यावर्षीच्या ऑस्करमध्ये पहिल्यांदा एका मुस्लिम अभिनेत्याला गौरवण्यात आलं. महेर्शाला अली याला मूनलाईट सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. मुळच्या भारतीय वंशाच्या अभिनेता देव पटेलला मागे टाकून त्याने या पुरस्कारावर बाजी मारली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा अॅवाॅर्ड कौतुकास्पदच आहे.

अॅलिसिया विकेंडर या गेल्या वर्षीच्या विजेतीच्या हस्ते अलीला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना अली म्हणाला की ,'मी माझ्या आयुष्यातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानतो. माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. त्यांनी मला शिकवलं की आपलं स्वत:चं असं काहीच नसतं. चित्रपटातील भूमिकांचे आपण नोकर असतो आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान आहे.'

त्याचं नाव जाहीर झाल्यानंतर सर्वांनी उभं राहून त्याचं अभिनंदन केलं.यावर्षीचा ऑस्कर अशाच अनेक कारणांनी वेगळा ठरला.

Loading...

'स्लमडॉग मिलेनिअर' फेम देवचा ऑस्कर हुकल्याने भारतीय नाराज झाले. त्याला 'लायन' या चित्रपटासाठी नामांकन मिळालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...