S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आमिरची प्रभावी 'नयी सोच'

Sonali Deshpande | Updated On: Feb 27, 2017 12:35 PM IST

आमिरची प्रभावी 'नयी सोच'

27 फेब्रुवारी : 'दंगल'च्या घवघवीत यशानंतर अभिनेता-दिग्दर्शक आमिर खान आणि नितेश तिवारी पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणासाठी एकत्र आलेत. एका खाजगी वाहिनीच्या जाहिरातीत हे दोघं 'छोरीयाँ छोरो से कम नहीं होती' हाच संदेश देतायत. ही जाहिरात लोकांनाही पसंत पडलीये आणि म्हणूनच ती माध्यमांत वायरल होतेय.

आपल्या दोन मुलींच्या मदतीने मिठाईचा व्यवसाय चालवणाऱ्या गुरदीपची भूमिका यात आमिरने केलीय. स्टार प्लसच्या 'नई सोच' या कँपेनखाली स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा जाहिरातीत हाताळला गेलाय. ५० सेकंदाच्या या जाहिरातीत एक मध्यमवर्गीय दुकानदार असलेला आमिर खान आपल्या यशाचं श्रेय आपल्या दोन मुलींना देताना दिसतोय.आधुनिक विचारांचं हे बाप-मुलीचं नातं त्यामुळेच वेगळं आणि उठावदार दिसतं. त्या तिघांचाही आत्मविश्वास या जाहिरातीला आपोआप वरच्या स्तरावर नेतो.

याविषयी बोलताना आमिर म्हणाला की, 'ही जाहिरात त्या प्रत्येक वडील आणि मुलीसाठी समर्पित आहे, जे स्वत: अशा बदलांचा भाग बनले.'

तर स्टार इंडियाचे अध्यक्ष उदय शंकर म्हणाले की ,'हा फक्त स्त्री-पुरुष असमानतेचा प्रश्न नाहीये. तर आता वेळ आलीय की वडिलांनीच आपल्या मुलींना आत्मविश्वास आणि मानाचं स्थान मिळवून द्यावं. आमिरनेही मुलींना प्रोत्साहन देणारा हा बाप छान रेखाटला आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close