आॅस्कर सोहळ्यावर मुंबईची छाप, सनी पवार,प्रियांका चोप्रा छा गए!

आॅस्कर सोहळ्यावर मुंबईची छाप, सनी पवार,प्रियांका चोप्रा छा गए!

  • Share this:

suny pawar

27 फेब्रुवारी : मुंबईचा सनी पवार सध्या ऑस्कर आणि हॉलिवूडमधील सर्वांचे लक्ष वेधणारा बालकलाकार ठरला आहे.सनी पवारने लायन या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.'लायन' चित्रपटात रॉनी मारा आणि ब्रिटिश अभिनेता देव पटेल यांच्या भूमिका आहेत. भारतीय अभिनेत्री दिप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यात भूमिका आहेत. 'लायन' हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

तर दुसरीकडे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.प्रियांका चोप्रा मागील वर्षीसुद्धा ऑस्करच्या रेड कार्पेटवर अवतरली होती आणि तेव्हाही तिने पांढ-या रंगाचाच गाऊन घातला होता त्यामुळे पांढरा रंग हा प्रियांकासाठी लकी आहे असं दिसतंय.

प्रियांका चोप्रा द रॉक या तिच्या बेवॉच या आगामी हॉलिवूडपटातील सहअभिनेत्यासोबत अवतरली आणि तिथे या दोघांनी बेवॉच सिनेमाची प्रसिद्धीदेखील केली. पहिल्यावहिल्या हॉलिवूड सिनेमाची प्रसिद्धी ऑस्करच्या रेड कार्पेटवर व्हावी यासारखं दुसरं भाग्य नाही.त्यामुळे देसी गर्ल प्रियांका रेड कार्पेटवर छा गयी असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 09:00 AM IST

ताज्या बातम्या