भाजपपेक्षा काँग्रेस परवडली; 'सामना'मधून सूचक राजकीय विधान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2017 10:40 AM IST

uddhav_thackery_on_yuti

27 फेब्रुवारी :  मुंबई महापालिकेत युती होणार की नाही, याचा सस्पेन्स कायम असताना, भाजपपेक्षा काँग्रेस परवडली, असं सूचक विधानकरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे.

'मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगलं केलं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची 'काँग्रेस' केली आहे त्याचx काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वत:त जिरवल्याने आणि आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वत:च काँग्रेसवाले झालेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसंच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हटलंय आजच्या सामन्यात?

Loading...

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची काँग्रेस केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत. साला मैं तो साब बन गयाच्या तालावर साला मैं तो काँग्रेसवाला बन गया असे नवे गीत रचून त्यावर विजयाच्या फुगड्या घालणाऱ्यांना सलाम!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...