27 फेब्रुवारी : अॅण्ड दी ऑस्कर गोज् टू… सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्काराच यंदा मूनलाईट या चित्रपटाने पटकावला आहे तर ‘ला ला लँड’ या चित्रपटाने सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत. आॅस्करच्या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याने .
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. आधी बेस्ट फिल्म म्हणूृन 'ला ला लँड'ला जाहीर झाल्यावर नंतर तो मूनलाईटला देण्यात आला. संपूर्ण जगात या चुकीची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही ऑस्कर आयोजकांवर टीकेची झोड उठायला सुरुवात झाली आहे.
या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेताचा ऑस्कर पुरस्कार केसी अफ्लेकला ‘मॅन्चेस्टर बाय द सी’ या चित्रपटासाठी ऑस्कर पटकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोन्सला ‘ला ला लँड’साठी देण्यात आला आहे. ला ला लँड या चित्रपटाने सर्वात जास्त म्हणजे 6 ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत. तर ला ला लँड , मूनलाईट, फेन्सेस, लायन, मँचेस्टर बाय द सी , हेल ऑर हाय वॉटर, हिडन फिगर्स, या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती. मात्र 'मूनलाईट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.
ऑस्करचं यंदाचं हे 89वर्षं आहे. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये रंगलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात हॉलिवूडसह बॉलिवूड ताऱ्यांचीही मांदियाळी जमली होती. सुप्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट जिमी किमेल यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.
भारतीयांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेल्या मोगलीची गोष्ट असलेल्या ' द जंगल बुक' या सुपरहिट चित्रपटानं सर्वोत्कृष्ट दृश्य परिणामासाठीचा (व्हिज्युअल इफेक्ट्स) प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. मात्र सहाय्यक अभिनेता विभागात भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेलची निराशा झाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी प्रमाणेच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यंदाही सोहळ्यास उपस्थित असून पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकाचं सौंदर्य खुलून दिसत होतं. त्याशिवाय, सनी पवार 8 वर्षाच्या मुंबईकर चिमुरड्यानं अॅकॅडमी अॅवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चालून मुंबई-महाराष्ट्रासह देशवासीयांची मान उंचावली आहे.
अँड ऑस्कर गोज टू…
- महेर्शाला अली-मूनलाईट
- अॅलसॅन्ड्रो, जॉर्जिओ, क्रिस्टएन -सुसाईड स्क्वॉड
- कॉलीन अॅटवूड-फॅन्टास्टिक बीस्ट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री-ओ.जे : मेड इन अमेरिका
- सिल्वेन बेलमरे -अरायव्हल
- हॅक्सॉ रिज
- वायोला डेवीस - फेन्सेस
- द सेल्समन
- पायपर
- झूटोपिया
- द जंगल बुक
- हॅक्सॉ रिज
- द व्हाईट हेलमेट्स
- सिंग
- ला ला लँड
- ला ला लँड
- सिटी ऑफ स्टार्स- ला ला लँड
- मॅन्चेस्टर बाय द सी
- मूनलाईट
- डेमियन सिझेल- ला ला लँड
- केसी अॅफ्लेक - मॅन्चेस्टर बाय द सी
- एम्मा स्टोन - ला ला लँड
- मूनलाईट
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा