मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मालगाडीचे डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • Share this:

2d730aa9-c620-4263-a4b9-08da68e92530

27 फेब्रुवारी :  मालगाडीचे डबे रूळावरून घसरल्यामुळे सोमवारी पहाटेपासून हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील जीटीबी स्थानकाजवळ आज (सोमवारी) पहाटे ही घटना घडली. त्यामुळे सध्या वडाळा ते कुर्ला या स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेच्या डाऊन दिशेकडून येणाऱ्या गाड्या कुर्ला स्थानकापर्यंतच चालवण्यात येत आहेत. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाड्यांचा प्रॉब्लेम झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सीएसटी-पनवेल मेनलाईनवरून वाहतूक सुरू आहे.

5ae4d65b-228b-46b9-8a4f-41ba7f594eb8

सध्या रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना सीएसटीपर्यंत जाण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एकुणच या गोंधळामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसौय झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2017, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading