S M L

2 लाखाला आर्मी भरती पेपर,ठाणे क्राइम ब्रँचनं केला पर्दापाश

Sonali Deshpande | Updated On: Feb 26, 2017 07:20 PM IST

2 लाखाला आर्मी भरती पेपर,ठाणे क्राइम ब्रँचनं केला पर्दापाश

26 फेब्रुवारी : राज्यातली आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आलीय. पेपर लीक झाल्यामुळे लष्करानं हा निर्णय घेतलाय. ठाणे क्राईम ब्रँचनं काल पुणे, नागपूर आणि गोव्यामधून १८ आरोपी आणि ३५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. तसंच सैन्यातल्या एका हवलदार आणि सुभेदाराला अटक झालीय.ठाणे क्राईम ब्रँचनं वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे मारले.ठाणे गुन्हे शाखेच्या 3 ते 4 पथकांनी ही कारवाई केली आहे.

पुण्यातून 9, नागपुरातून 5 आणि गोव्यातून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे,तर पुणे 79 विद्यार्थी,नागपूरमधून 222 आणि गोव्यातून 49 विद्यार्थ्यांना या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यात संस्कार हॉलमध्ये ही परीक्षा होणार होती.तिथे काल विद्यार्थी थांबले होते.याच हॉलवर पोलिसांनी छापा मारला, आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. या विद्यार्थ्यांकडे फुटलेला पेपर होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

दरम्यान, आज सकाळी आर्मी भरती परीक्षेत तोच पेपर येणार होता जो या विद्यार्थ्यांकडे सापडला आहे.प्रत्येकी २ लाख रुपये देऊन विद्यार्थ्यांनी हा पेपर घेतल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. याचा तपास लष्कराचा सदर्न कमांड आणि पोलीस, दोघंही करतायेत. लष्करानं स्वतंत्र चौकशीही सुरू केलीय.तसंच विद्यार्थ्यांकडे व्हॉट्सअॅपवरून हा पेपर यायचा आणि मग त्याची प्रिंट काढली जायची.

ठाणे पोलीस आरोपींना ठाण्यात घेऊन येणार आहेत.ठाण्यातील कळवामध्ये आयपीसी 409, 420, 120 तसंच 72नुसार 13A 13C आणि 13D कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय, तर 5 गाड्या आणि काही मोबाईल्स जप्त करण्यात

Loading...

आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 07:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close