आॅस्करचं काऊंटडाऊन सुरू!

 आॅस्करचं काऊंटडाऊन सुरू!

  • Share this:

oscars20172

चित्राली चोगले,26 फेब्रुवारी : अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात.चर्चा रंगतात, जल्लोष होतो, नाराजी देखील असते. पण सगळ्यात उत्सुकता असते ती अखेर या अकॅडमी अॅवॉर्डसची, त्या ग्लॅमरस सोहळ्याची आणि विजेता कोण होणार याची.यंदा सुद्धा असंच काहीसं आहे.येत्या 26 फेब्रुवारी रोजी हा सोहळा लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणारे. याचं थेट प्रक्षेपण भारतात 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.30 वाजता सुरू होईल.हा सोहळा एक्लुझिव्ह स्टार मुव्हीज चॅनलवरच पहाता येणारे.27 फेब्रुवारीच्या सकाळी 5.30 वाजल्यापासून हा सोहळा भारतात लाईव्ह बघता येईल तर याचा रिपीट टेलीकास्ट त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता असेल.

यंदा जिम्मी किमेल या अॅवॉर्ड सोहळ्याचं सूत्रसंचालन करणारे त्याने या बाबत हल्लीच ट्विट देखील केलं.अॅकॅडमी अवॉर्ड होस्ट करण्याचं हे जिमीचं पहिलं वर्ष असलं तरी या आधी त्याने 2012

आणि 2016चे एमी अवॉर्डस् होस्ट केलेत.

oscar-123नेहमी प्रमाणे 89व्या ऑस्कर पुरस्कारांची चर्चा, उत्सुकता आणि फॅन फोलोविंग तर खूपच आहे.या सगळ्या गरमागरमीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

अपेक्षेप्रमाणे 'ला ला लॅण्ड' सिनेमाने यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशन्सवर वर्चस्व गाजवलंय.14 नॉमिनेशन्स मिळवत रेकॉर्ड ब्रेक करणारा हा यंदाचा एकमेव सिनेमा ठरलाय.यंदाच्या गोल्डन ग्लोब्समध्ये देखील सिनेमाने अनेक पुरस्कार पटकवले आणि सिनेमा किती उत्तम जमून आलाय हे सिद्ध झालं.आता अकॅडमी अॅवॉर्डसमध्ये सुद्धा हेच दृष्य दिसेल का? की सगळं चित्रंच बदलेलं असेल हे बघण्यासारखं असेल.

या व्यतिरिक्त विशेष आकर्षण ठरलं मेरील स्ट्रीप यांना मिळालेलं यंदाचं नॉमिनेशन्स. त्यांच्या फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालंय.हे त्यांचं 20वं नॉमिनेशन आहे आणि 3 वेळा त्यांनी या गोल्डन ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरण्याचा मान मिळवलाय.फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स हा फ्लोरन्स जर्किन्स यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा.मेरील यांच्या अजरामर अभिनयाने त्याला वेगळीच उंची मिळालीये.यंदाच्या गोल्डन ग्लोब्समध्ये याच सिनेमासाठी सेसील बी देमील हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आलं.याच गोल्डन ग्लोब्सची पुनरावृत्ती करून या सिनेमासाठी यंदा 4था ऑस्कर अॅवॉर्ड त्या घरी घेऊन जाणार का हे यंदाचं एक मुख्य आकर्षण ठरणारे.

या सगळ्या नॉमिनेशन्समध्ये लायन या सिनेमाने ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.सिनेमाची चर्चा तशी जोरदार होती. पण सिनेमा थेट सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळवेल हे फारसं स्पष्ट नव्हंत. लायनने सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून नॉमिनेशन तर मिळवलंच.शिवाय निकोल किडमॅनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर देव पटेलला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून या सिनेमासाठी नॉमिनेशन मिळालीयेत.

देव पटेल गेली अनेक वर्ष अनेक हिट सिनेमे देऊन सुद्धा या ऑस्कर अॅवॉर्डपासून वंचितच राहिला होता.यंदा त्याला पहिल्यांदाच नॉमिनेशन मिळालंय.त्याने यंदाच्या बाफ्टाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर त्याचं नाव तर कोरलंय, तसंच ऑस्कर सोहळ्यातही होईल का हे तर 27 फ्रेब्रुवारी रोजी कळेल.

या 89व्या पुरस्कारात सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा कुठला ठरेल असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.मोयन्ना सिनेमा खूपच लोकप्रियता मिळवलीये. नेहमीच्या मोठ्याल्आ महालात रहाणाऱ्या राजकुमारींपेक्षा डिस्नेची ही राजकुमारी मात्र वेगळी आहे.तिचं हे वेगळेपणच हटके ठरलंय. तेच सिनेमाला पुरस्कार ही मिळवून देईल का?

शिवाय यंदा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळणार त्या नावांच्या यादीत लिओनार्डो, प्रियांका चोप्रा. एम्मा वॉटसन अशी भारी नावं आहेत.त्याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेच.या सगळ्या नॉमिनशेनच्या गरमागरमीत खरी बाजी कोण मारते ते लवकरंच कळेल.सध्या तरी आपण अंदाज बांधत 27 फ्रेब्रुवारीची वाट पाहत,अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ऐकण्यासाठी सज्ज होऊयात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 06:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading