राज्यात जिल्हा परिषदांसाठी काँग्रेससोबत आघाडी - शरद पवार

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2017 09:20 PM IST

राज्यात जिल्हा परिषदांसाठी काँग्रेससोबत आघाडी - शरद पवार

26 फेब्रुवारी : राज्यात जिल्हा परिषदांसाठी काँग्रेससोबतआघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सहमती दर्शवली आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात आज यासाठी नांदेडमध्ये चर्चा झाली. यावेळी 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीसाठी पवार सहमत झाले.

मुंबईत भाजपचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार म्हणाले. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील,असं त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या बाबतीत काँग्रेसचं काय धोरण आहे माहीत नाही, असं म्हणून शिवसेनेबद्दलही सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'सेनेला फार कमी मतांची गरज आहे, काही अपक्ष सेनेने मिळवले, अजून काही मिळवतील.'

भाजपचा महापौर व्हावा,अशी इच्छा नसल्याचं पवारांनी सांगितलं. सेना राज्याची सत्ता सोडेल असं वाटत नाही आणि सेनेने सत्ता सोडली तर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ, पण आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, असं पवारांनी स्पष्ट सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close