खारघरमध्ये २० जणांना अन्नातून विषबाधा

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2017 02:32 PM IST

खारघरमध्ये २० जणांना अन्नातून विषबाधा

26 फेब्रुवारी : खारघरमध्ये २० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आलीय. खारघरमधील फूथपाथवर असलेल्या अनधिकृत खाद्य पदार्थांतून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या नागरिकांनी या दुकानदाराकडून चिकन शौर्मा हा पदार्थ खाल्ला होता.त्यानंतर काही नागरिकांना पोट दुखणं, उलट्या होणं असा त्रास होऊ लागलाय.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फेरिवाल्यांचं साम्राज्य पसरलेय.मुख्य म्हणजे हे तेच दूकान आहे ज्यावर 3 दिवसांपूर्वीच आयुक्तांकडून कारवाई करण्यात आली होती. परंतु 4 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याचं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close