पेपर फुटल्याने लष्कर भरती परीक्षा रद्द

पेपर फुटल्याने लष्कर भरती परीक्षा रद्द

  • Share this:

army

26 फेब्रुवारी : राज्यातली आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आलीय. पेपर लीक झाल्यामुळे लष्करानं हा निर्णय घेतलाय. ठाणे क्राईम ब्रांचनं काल पुणे, नागपूर आणि गोव्यामधून १८ आरोपी आणि ३५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय.तसंच सेनेतल्या एका हवालदार आणि सुभेदाराला अटक झालीय.ठाणे क्राईम ब्रँचनं वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे मारले.

पुण्यात संस्कार हॉलमध्ये ही परीक्षा होणार होती. तिथे काल विद्यार्थी थांबले होते.याच हॉलवर पोलिसांनी छापा मारला, आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. या विद्यार्थ्यांकडे फुटलेला पेपर होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

दरम्यान, आज सकाळी आर्मी भरती परीक्षेत तोच पेपर येणार होता का, याचा तपास सुरू आहे. प्रत्येकी २ लाख रुपये देऊन विद्यार्थ्यांनी हा पेपर घेतल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. याचा तपास लष्कराचा सदर्न कमांड आणि पोलीस, दोघंही करतायेत. लष्करानं स्वतंत्र चौकशीही सुरू केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 26, 2017, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading