मी रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही- मुख्यमंत्री

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2017 03:59 PM IST

मी रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही- मुख्यमंत्री

26 फेब्रुवारी: मी विदर्भाचा माणूस आहे, मी जंगलातल्या आणि रस्त्यावरच्या वाघाला घाबरत नाही, असं ठसठशीत विधान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.'लोकमतच्या कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डस्'मध्ये बोलत होते. लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.

नरेंद्र मोदी एकमेव आणि अद्वितीय आहेत, मी फक्त सामान्य माणूस आहे, असंही ते म्हणाले. विजयाबद्दल त्यांना विचारल्यावर, माझ्याकडे गमवायला काहीही नाही, त्यामुळे जे आहे ते मिळवायचंच आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर विजयवीराच्या भूमिकेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे समीकरण झाले आहे का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे एकमेवाद्वितीय आहेत, तसा दुसरा कोणी होणे नाही.

निवडणुकीतील यश माझे एकट्याचे नसून माझ्यासोबत मोठी ‘टीम’ आहे. जी कधीही चेहऱ्यासाठी भांडत नाही. ‘टीम’ला माझा चेहरा दिला आहे, त्यासाठी ती काम करते. सक्षम ‘टीम’ असली की अडचणी कमी येतात, असेही ते म्हणाले.

ग्रामीण जनतेने भाजपावर इतका विश्वास कसा दाखवला, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, 'ग्रामीण भागात दोन वर्षे दुष्काळाचा सामना केला. जलयुक्त शिवार योजनेतून आतापर्यंत दुष्काळमुक्तीच्या दिशेने भरपूर काम केलं आहे.' वर्षाअखेरपर्यंत ११ हजार गावं दुष्काळमुक्त होतील,असा विश्वास त्यांनी प्रकट केला.

मुख्यमंत्र्यांना रात्री 2वाजता एसएमएस केला, तरी ते उत्तर देतात, असं दर्डांनी विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'मला हल्ली लोकांच्या अपेक्षांमुळे झोप लागत नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close