S M L

काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नका!, आठवले उद्या 'मातोश्री'वर जाणार

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2017 10:54 PM IST

काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नका!, आठवले उद्या 'मातोश्री'वर जाणार

25 फेब्रुवारी : काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नका, भाजपसोबत युती करा अशी मनधरणी करण्यासाठी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उद्या(रविवारी) मातोश्रीवर जाणार आहे. उद्धव ठाकरेंकडे भाजप आणि शिवसेना युतीचा प्रस्ताव मांडणार असल्याचंही आठवलेंनी आयबीएन लोकमतला सांगितलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपने दावा ठोकला खरा पण बहुमत नसल्यामुळे दोन्ही पक्षाकडे युतीशिवाय पर्याय नाही. पण, युती करण्यावर कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाही. शिवसेनेनं आता काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची तयारी सुरू केलीये. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडालीये. एकेकाळी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा देऊन सेनेसोबत एकत्र राहिलेले रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.

याआधी आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन  त्यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. शिवसेनेनं भाजपचा पाठिंबा घ्यावा असा प्रस्ताव मांडला. अडीच-अडीच वर्ष महापौरपद वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला तर दोन्ही पक्षाचे महापौर होईल असा प्रस्ताव मांडल्याचं आठवलेंनी सांगितलं.


तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन बोलणं झालंय. उद्या त्यांना भेटायला 'मातोश्री'वर जाणार आहे. दोन्ही पक्षामध्ये समन्वय करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती असताना मी सेनेसोबत होतो. उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले आहे. शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये हे समजून सांगण्यासाठी मी मातोश्रीवर जाणार आहे.ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर असा प्रस्ताव मांडणार आहे अशी माहितीही आठवलेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 10:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close