...तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत नाही -वायकर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 10:56 PM IST

...तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत नाही -वायकर

ravindra_vaikar325 फेब्रुवारी : मुंबईत शिवसेनेचा महापौर बनणार असेल तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत काय असं वक्तव्य शिवसेना आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केलंय.

मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा असेल याबाबत सस्पेन्स कायम असताना गरज पडल्यास शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा स्विकारण्याची तयारी दर्शवलीय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या  नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बनणार असेल तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत नसल्याचं वक्तव्य केलंय.

शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जे जे मदत करतील त्यांची मदत शिवसेना नक्की घेईल असं त्यांनी सष्ट केलंय. काहीही झालं तरीही येत्या ९ मार्चला होणाऱ्या महापौर निवडणुकीत सेनेचाच महापौर होणार असं त्यांनी सांगितलंय. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी याबद्दल कोणतीही भूमिका मांडली नाही. थोडं थांबा वेळ आल्यावर सगळं काही सांगेन असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. पण, सेनेतून सत्तेसाठी कोणत्याही तडजोडीसाठी तयार असल्याचं दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...