भाजपने पैसे वाटले म्हणूनच एवढं मोठं यश -प्रकाश आंबेडकर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 08:36 PM IST

Prakash ambedkar25 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीत भाजपने पैशाचा महापूर केला म्हणूनच त्यांना एवढं मोठं यश मिळालं असा थेट आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

ज्या ज्या प्रभागांमध्ये पैशाचा महापूर केला गेला त्याची यादी आपल्याकडे आहे असा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला.

मी जर खोटं बोलत असेल तर भाजपाने माझ्यावर गुन्हा दाखल करावा असं आव्हान देखिल आंबेडकर यांनी भाजपला दिलंय.

उद्धव ठाकरे यांना आता पक्ष पुढे न्यायचा असेल तर यापुढे त्यांना आपण कुणासोबतही युती करणार नाही या शब्दावर ठाम राहावे लागेल अन्यथा भाजपची मित्रपक्षासोबत असलेली वागणूक लक्षात घेता 2019 पर्यंत सेनेला भवितव्य राहणार नाही अशी भीतीही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...