25 फेब्रुवारी : पिकावर बसलेली पाखरं कशी उडवायची हे मला चांगलच माहीत आहे असं सुचक वक्तव्य कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालाय. आपल्या मुलाचा पराभव सदाभाऊंना चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यांनी आपले सहकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना यांना यासाठी जबाबदार धरलंय.जू शेट्टी हे घराणेशाही विरोधात तत्वांचा राजकारण करता, त्यांनी तसंच तत्वांचा राजकारण आयुष्यभर करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी टीका सदाभाऊंनी केली होती.
आज औरंगाबादेत एका कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले असता शेट्टी-खोत वादावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजू शेट्टी यांचं मोठेपण मला मान्य आहे. कुणालातरी आमच्यामध्ये दरी निर्माण करायची आहे. मात्र जमिनीत बियाणं कसं पेरायचं...आलेल्या पिकावर बसलेली पाखरं कशी उडवायची हे मला चांगलच माहीत आहे असं सुचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv