येतील त्यांच्यासोबत आणि येणार नाही त्यांच्याशिवाय पुढे जाणार -मुख्यमंत्री

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 10:22 PM IST

येतील त्यांच्यासोबत आणि येणार नाही त्यांच्याशिवाय पुढे जाणार -मुख्यमंत्री

fadanvis_425 फेब्रुवारी : जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या विजय सभेत बोलून दाखवलाय. काहीही झालं तरीही काँग्रेससोबत जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत विजयानंतर नरिमन पाईंट इथं भाजपने विजयी जल्लोष केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. हा विजय त्यांनी कार्यकर्त्यांनी सुपूर्द केला. यावेळी त्यांनी भाजप काँग्रेस सोबत जाणार नाही म्हणजे नाही असं स्पष्टपणे सांगितलं. मात्र ज्यांना जायचंय ते खुशाल जाऊ शकतात असं म्हणायलाही ते मागे सरले नाही. काहीही झालं तरिही पक्ष पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं आवर्जून सांगितलं.

नोटबंदीचा मुद्दा पुढे करून भाजपवर विरोधकांनी टीका केली असली तरीही लोकांना हा निर्णय आपल्या भल्यासाठी घेतला असल्याचं माहित होतं असंही त्यांनी सांगितलं. मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवरच पक्षाला हे यश मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...