'माझ्या पतीचं अमेरिकेवर प्रेम होतं, मग का मारलं ?'

'माझ्या पतीचं अमेरिकेवर प्रेम होतं, मग का मारलं ?'

  • Share this:

president325 फेब्रुवारी : अमेरिकेमध्ये एका भारतीयाचा गोळीबारात मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना घडलीय. श्रीनिवास कुचिबोटला हा तरुण गोळीबारात मृत्युमुखी पडला. कानसासमधल्या ओलाथमध्ये एका बारमध्ये गोळीबार झाला. त्यात श्रीनिवासचा मृत्यू ओढवला आणि त्याचा मित्र आलोक मदसानी या गोळीबारात जखमी झाला. या दोघांसोबत एक अमेरिकन तरुणही होता. वंशभेदामुळे भारतीयांना लक्ष्य करून हा गोळीबार झाला, असा आरोप होतोय. याबद्दल डॉनल्ड ट्रम्प यांच्या विखारी प्रचारालाही जबादार धरलं जातंय.

या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यायत. श्रीनिवास कुचिबोतला याची पत्नी सुनयना दुमला हिने अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन आपल्या वेदनेला वाचा फोडली. माझ्या पतीचं अमेरिकेवर प्रेम होतं. त्याने अमेरिकाविरोधी कोणतंही कृत्य केलेलं नव्हतं तरीही त्याला केवळ द्वेषापोटी मारण्यात आलं, असं तिने म्हटलंय.

श्रीनिवास कुचिबोतला हा हैदराबादचा तरुण आहे. तो ओलाथमध्ये ऑस्टिन्स बार अँड ग्रिलमध्ये बसला होता. त्यावेळी अॅडम प्युरिंटन नावाचा इसम तिथे आला आणि त्याने 'गेट आऊट माय कंट्री' अशी धमकी त्यांना दिली. या अॅडमला पाच तासांनी अटक करण्यात आली. श्रीनिवास आणि त्याचा मित्र आलोक जर्मिन या कंपनीत काम करायचे. आता मात्र आम्ही अमेरिका सोडून जाण्याचा विचार करतोय, असं श्रीनिवासच्या पत्नीने म्हटलंय.

अमेरिकेत भारतीयांवर झालेल्या या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसने याचा निषेध करणारं एक पत्रकही काढलेलं नाही. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याउलट ट्रम्प यांनी आपला अमेरिका फर्स्टचा अजेंडाच पुढे रेटलाय. मी जगाचं प्रतिनिधित्व करत नाही, मी अमेरिकेचं नेतृत्व करतो, असं ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करून टाकलं.

भारतीय तरुणाच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त करणं तर सोडाच पण ट्रम्प यांनी फक्त शिकागोमध्ये झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. शिकागोमध्ये सात जण मृत्युमुखी पडले, इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय. तिथे तातडीने मदत पाठवायला हवी, असं ट्रम्प म्हणाले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अमेरिकेतल्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत,असं म्हटलंय. भारतातल्या अमेरिकन दूतावासाने  याबद्दल दु:ख व्यक्त केलंय. अमेरिकेमध्ये सगळ्याच स्थलांतरितांचं स्वागत आहे. जगभरातले नागरिक अमेरिकेला भेट देऊ शकतात, इथे काम करू शकतात तसंच शिक्षणासाठीही येऊ शकतात, असं त्यांनी म्हटलंय.पण तरीही भारतीयांवर झालेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक चिंतेत आहेत.

व्हिडिओ सौजन्य - KCTV5 News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 07:05 PM IST

ताज्या बातम्या