S M L

शिवसेनेचं संख्याबळ वाढता वाढे,आणखी एक अपक्ष गळाला ; संख्या 88 वर

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2017 06:23 PM IST

शिवसेनेचं संख्याबळ वाढता वाढे,आणखी एक अपक्ष गळाला ; संख्या 88 वर

25 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. शिवसेना एक अपक्ष,बंडखोरांनी सोबत घेऊन संख्या वाढवत आहे. आज आणखी एक अपक्ष सेनेच्या गळाला लागला आहे. सेनेचं संख्याबळ आता 88 वर पोहोचलंय.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला अपक्ष नगरसेवकांची गरज आहे. आणि ही गरज ठाणे महापालिका एकहाती जिंकणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे पूर्ण करतायेत. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या दोन अपक्ष नगरसेवकांना आज शिवसेना भवनात ते घेऊन आले. त्यामुळे मुंबईत शिवसेनेचं संख्याबळ आता ८८ झालं आहे. अपक्ष किरण लांडगे शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय. काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे या दोन सेना बंडखोरांनी आणि चंगेज मुलतानी या अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 06:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close