काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत, सेनेला पाठिंबा दिला तर भाजपचं स्वप्न धुळीस ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 07:19 PM IST

काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत, सेनेला पाठिंबा दिला तर भाजपचं स्वप्न धुळीस ?

congress_bjp_sena25 फेब्रुवारी : जे खेळी विधानसभेच्या वेळेस शरद पवारांनी खेळली ती खेळण्याची संधी सध्या काँग्रेसकडे आलीय. आणि त्याच खेळीवर जशी भाजपनं शिवसेनेला गार करण्याचा प्रयत्न केला त्याची परतफेड करण्याची संधी शिवसेनेला आलीय.

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेला बहुमतासाठी आकडा हवाय, त्यासाठी सध्या तरी भाजपला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. पण काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपचा खेळ खल्लास. सेना काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभी राहू शकते. सोशल मीडियावरही ह्याच फॉर्म्युल्याची चर्चा जोरदार आहे.

कालच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतही यावर चर्चा झालीय. त्यात काही नेत्यांनी सेनेला पाठिंबा द्यावा यासाठी राहुल गांधींनाही गळ घातल्याचं कळतंय. त्यावर काँग्रेसचं नेतृत्वही विचार करतंय असं समजतंय.

असं असलं तरी मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीत खरी किंगमेकर ठरणार आहे ती काँग्रेसच...म्हणूनच पडद्याआडून शिवसेना काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. पण काँग्रेसला युपी इलेक्शन होईपर्यंत शिवसेनेला जाहीरपणे पाठिंबा देणं नैतिकदृष्ठ्या परवडणारं नसल्यानं महापौरपदाच्या निवडीवेळी काँग्रेस सेनेला छुपा पाठिंबा देण्यासाठी एकतर तटस्थ राहू शकते किंवा सभात्याग करू शकते. तसंही एकेकाळी सेनेला काँग्रेसची वसंतसेना म्हटलं जायचं.

1978 साली शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा महापौर झाले होते आणि त्याबदल्यात सेनेचे वामनराव महाडीकांना काँग्रेसनं निवडून आणण्यात मदत केली होती.

Loading...

सद्यस्थितीत मात्र, काँग्रेस नेते या सेनेला पाठिंबा देण्याबाबत काहीशी सावध भूमिका घेताना दिसताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...