'कांगारू'ने रोखला विराट विजय रथ, मायभूमीत भारताचा दारुण पराभव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 05:58 PM IST

'कांगारू'ने रोखला विराट विजय रथ, मायभूमीत भारताचा दारुण पराभव

indvsaus25 फेब्रुवारी : पुणे कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने अखेर 'विराट विजयाचा रथ'  रोखलाय. तिसऱ्यादिवशी आॅस्ट्रेलियाने भारताचा 333 रन्सने दारूण पराभव केलाय. आपल्याच मायभूमीत भारताचा हा सर्वात मोठा दुसरा पराभव आहे.  या विजयासह आॅस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये.

पुणे कसोटीत आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 441 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पण, भारतीय टीम अवघ्या 107 रन्सवर गार झाली.  आॅस्ट्रेलियाकडून स्टीव ओकीफने दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक 6 विकेट घेतल्यात. तर नेथन लाॅयनने चार विकेट मिळवल्यात. आॅस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 260 रन्स केले. तर भारताने 105 रन्स केले होते. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भारतापुढे 285 रन्सचे टार्गेट ठेवण्यात आलं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारी टीम इंडियाची खराब सुरूवात झाली. 20 रन्सवर मुरली विजय आऊट झाला. त्यानंतर लोकेश राहुल 10 रन्स करून तंबूत परतला. विराट कोहलीने टीम इंडियाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला खरा पण तोही 13 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर भारतीय टीमला उतरती कळा लागली.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 441 रन्सचं टार्गेट ठेवलं. आधीच आॅस्ट्रेलियाने पहिला इनिंगमध्ये 260 रन्स केले तर दुसऱ्या इनिंगमध्ये 285 रन्स केले होते. 441 धावांचा पाठलाग करताना भारतीय टीमचा कांगारूच्या माऱ्यापुढे टीकावा लागला नाही. आणि अवघी टीम 107 रन्सवर ढेर झाली.  आपल्याच मायभूमीत भारताचा हा सर्वात मोठा दुसरा पराभव आहे. याआधी 2004 मध्ये आस्ट्रेलियानेच भारताला नागपूर इथं 342 रन्सने हरवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...