काँग्रेसशी युती ?, थोडं थांबा, योग्य वेळेवर सांगतो -उद्धव ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 05:26 PM IST

काँग्रेसशी युती ?, थोडं थांबा, योग्य वेळेवर सांगतो -उद्धव ठाकरे

uddhav_gadakari25 फेब्रुवारी :  काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एवढी काय आहे थोडं थांबा योग्य वेळी सांगतो अशी सूचक प्रतिक्रिया दिलीये. तसंच नितीन गडकरी यांच्या राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या प्रश्नावर जय महाराष्ट्र केलाय.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आलाय. भाजपने काँग्रेससोबत घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. तर  बंडखोर आणि अपक्षाला सोबत घेऊन शिवसेनेचं संख्याबळ 88 वर पोहोचलंय.

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत हालचाल सुरू केली.  काँग्रेस आणि सेनेच्या संभाव्य युतीला भाजप नेते चांगलेच घाबरलेत, असं दिसतंय. काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे म्हणून काही काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यावर विचार करतायेत, यावर सेना आणि भाजपनं विचार करावा, असं आज गडकरींनी बोलून दाखवलं.

मात्र, गडकरींच्या या अस्थिर वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी 'जय महाराष्ट्र' अशीच प्रतिक्रिया दिलीय. एवढंच नाहीतर एवढी घाई करू नका, थोडं थांबा वेळेवर सांगतो असं सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...