काँग्रेसला राज्यातील सरकार पाडायचंय - नितीन गडकरी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 02:33 PM IST

nitin_gadkari

25 फेब्रुवारी : काँग्रेस आणि सेनेच्या संभाव्य युतीला भाजप नेते चांगलेच घाबरलेत, असं दिसतंय. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या या ‘खेळी’वरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे म्हणूनच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करतायेत असा, असं नितीन गडकरींनी बोलून दाखवलं.

मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरीही, स्पष्ट बहुमत काही मिळालेलं नाही. मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेला बहुमतासाठी आकडा हवाय, त्यासाठी सध्या तरी भाजपला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. पण काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपचा खेळ खल्लास. सेना काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभी राहू शकते.  त्यात मुंबईत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपणे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे भाजपने संताप व्यक्त केला असून, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट काँग्रेसवर नाराजी व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरही ह्याच फॉर्म्युल्याची चर्चा जोरदार आहे. कालच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतही यावर चर्चा झालीय. त्यात काही नेत्यांनी सेनेला पाठिंबा द्यावा यासाठी राहुल गांधींनाही गळ घातल्याचं कळतंय. त्यावर काँग्रेसचं नेतृत्वही विचार करतंय असं समजतंय. विशेष म्हणजे 1978 साली शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा महापौर झाले होते आणि त्याबदल्यात सेनेचे वामनराव महाडीकांना काँग्रेसनं निवडून आणण्यात मदत केली होती.

काँग्रेसला राज्यातील भाजपचे सरकार पाडायचं आहे, असं वाटते. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतची वक्तव्ये त्यांच्या नेत्यांकडून का केली जात आहेत, असा सवाल नितीन गडकरी यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असंही नितीन गडकरी म्हणालं.

Loading...

गडकरी यांनी याआधीही शिवसेना-भाजपने एकत्र आले पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. दोन्ही पक्षांकडे एकत्र येण्याशिवाय़ दुसरा कोणताही पर्याय नाही, असं ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...