राज ठाकरेंनी संजय तुर्डेची घेतली भेट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 02:33 PM IST

राज ठाकरेंनी संजय तुर्डेची घेतली भेट

raj thackray

25 फेब्रुवारी :   निवडणूकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी मनसेच्या विजयी झालेल्या संजय तुरडे या उमेदवारावर गुरुवारी रात्री हल्ला केला होता. यात तुरडे आणि मनसे कार्यकर्ते जखमी झाले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुंबईत निवडणूक निकाल जाहीर झाल्याणानंतर कुर्ल्यात भाजपच्या पराभूत उमेदवाराने मनसेचे निवडून आलेले नगरसेवक संजय तुरडे यांना जबर मारहाण केली होती. सुधीर खातू अस या भाजपच्या उमेदवाराच नाव आहे. त्याने आपल्या 100 ते 200 कार्यकर्त्याना घेऊन कुर्ला बैल बाजार इथल्या असलेल्या मनसेच्या कार्यालयात बसलेल्या संजय तुरडे यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांवरही लाठी, हॉकी स्टिकने मारहाण केली. यात 8 ते 10 कार्यकर्त्यांना जबर मार लागला तर संजय तुरडे यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजावाडी रुग्णालयात जाऊन नगरसेवक संजय तुरडे आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पण यावेळी मीडियाशी बोलण मात्र राज ठाकरे यांनी टाळलं. यावेळी राजावाडी रुग्णालयात असंख्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...