परमार आत्महत्या प्रकरणातील तीन नगरसेवक विजयी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 11:54 AM IST

परमार आत्महत्या प्रकरणातील तीन नगरसेवक विजयी

suraj_parmar

25 फेब्रुवारी :  ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार  आत्महत्या प्रकरणातील आरोपी विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे तीनही नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आले आहेत. तर सुधारक चव्हाण यांचा पराभव झाला आहे.

या चार नगरसेवकांची नावं परमार यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रात लिहून ठेवली होती. ठाणे पोलिसांनी या चौघांना या पत्राच्या आधारे अटक केली होती. या प्रकरणामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परमार यांनी लिहिलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना परमार यांनी दिलेल्या निवडणूक देणग्यांचा उल्लेखही आढळला होता. या प्रकरणानंतर ठाणे महापालिकेतील भ्रष्ट साखळी मोडून काढण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...