भाजपच्या यशाचा फुगा खरंच इतका मोठा आहे का?- उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 02:36 PM IST

uddhav_on_cm

25 फेब्रुवारी : राज्यात 10 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदा- पंचायत समित्यांच्या लागलेल्या निकालात भाजपाला मोठे यश मिळालं असलं तरी शिवसेनेने भाजपाच्या यशाबाबत प्रशचिन्ह  उपस्थित केलेत. 'निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा मान्य आहे. पण या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून विचारला आहे.

भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत, असा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे.

'विजयाचा आनंद साजरा करण्यात काही गैर नाही. मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’ गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने, हे मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी' अशी टीका उद्धव यांनी केली. ' विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते' असेही त्यांनी अग्रलेखात नमूद केलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ?

Loading...

 भाजपनं जो आकडा गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा मटका त्यांच्याकडे असल्याने हे मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि मिसळलेला वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते. यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. भाजपचा टक्का वाढला हे जरी खरे असले तरी टोणपेही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले टक्के सांगितले जातात आणि बसलेले टोणपे लपवले जातात इतकेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...