S M L

शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष, संख्याबळ आता 88 वर

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2017 12:12 AM IST

शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष, संख्याबळ आता 88 वर

25 फेब्रुवारी : मुंबईत महापौरपदावर सेनेसोबतच भाजपनेही दावा ठोकल्याने या दोन्ही मित्रपक्षात सत्तापदांसाठी पुन्हा एकदा रस्सीखेच निर्माण झालीय. किंबहुना कसल्याही परिस्थितीत भाजपची मदत न घेताच मुंबईत सेनेचाच महापौर बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केलीय. सेनेच्या 4 बंडखोर नगरसेवकांना थेट मातोश्रीवर बोलावून सेनेचं संख्याबळ आत्ताच 88वर नेऊन ठेवलंय.

मुंबईचा महापौर शिवसेनेचाच बनवण्यासाठी शिवसेननं बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केलीये.महापालिकेत निवडून आलेल्या दोन बंडखोर आणि एका अपक्षाला शिवसेनेला गळाला लावण्यात यश आलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 87 वर गेलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे या दोन सेना बंडखोरांनी आणि चंगेज मुलतानी या अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवलाय. त्यानंतर संध्याकाळी आणखी एक अपक्ष सेनेच्या गळाला लागला. मुंबई वॉर्ड क्रमाकं १६० चे अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ ८८ वर पोहोचलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 12:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close