उल्हासनगरमध्ये भाजपला 'साई'ची साथ, सेनेच्या मनसुब्याला धक्का

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 12:00 AM IST

bjp-flag-rally24 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिकेत भाजपने साईपक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. साई पक्षाला सोबत घेऊन भाजपने शिवसेनेच्या मनसुब्याला धक्का दिलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार पडली. सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला उल्हासनगरमध्ये काही नगरसेवकांची मदत लागणार होती. साई पक्ष ही गरज पूर्ण करणार असल्यानं महापौर भाजपचाच होणार हे आता निश्चित झालंय. उल्हानगरमध्ये भाजपला 32 जागा मिळाल्यात. तर साई पक्षाला 11 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 38 जागांची गरज आहे. साईपक्षाला सोबत घेऊन भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. साई पक्षाला सोबत घेत भाजपनं शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 12:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...