काँग्रेस नकोच, सेनेचा विचार करू; भाजपची भूमिका

काँग्रेस नकोच, सेनेचा विचार करू; भाजपची भूमिका

  • Share this:

ashish_shelar24 फेब्रुवारी :  मुंबई महापालिकेच्या युती बाबत निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये कुणासोबत जायचं नाही असा निर्णय भाजप कोअर कमिटीमध्ये घेण्यात आलाय. तसंच आम्ही काँग्रेस सारख्या पक्षाला सोबत घेणार नाही असं सांगत भाजपने सेनेबरोबर जाणार असे संकेत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले.

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारसह अन्य नेते उपस्थितीत होते.

या बैठकीत इतर काँग्रेसचा पाठिंबा न घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. मीडियाशी बोलताना आशिष शेलार यांनी काँग्रेस किंवा अपक्षांना सोबत घेण्याबद्दल आमचा कोणताही निर्णय झाला नाही असं सांगत त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. तसंच पण आमचा पारदर्शकतेचा मुद्दा कायम राहिल असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

तसंच या बैठकीत राज्याच्या जिल्हापरिषद आणि महापालिकांच्या आढावा घेण्यात आला. सांगली, कोल्हापुर, जालना, औरंगाबाद, गडचिरोली, बुलढाणा,जळगांव सारख्या जिल्हा परिषदबाबत काय निर्णय घ्यायचा, सेनेबरोबर युती करायची का ? की अन्य निर्णय घ्ययायचा हे मुंबई युतीचा निर्णय अंतिम झाल्यावर होईल असं ठरल्याचं कळतंय.तसंच यवतमाळ, नाशिक, हिंगोली सारख्या जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापनेसाठी सेनेला साथ द्यायची का याबाबत अंतिम निर्णय त्याच वेळी घेण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 24, 2017, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading