24 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुपतीच्या वेंकटेश्वर देवस्थानला 5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले होते. आणि आता त्यांनी आणखी एका देवस्थानात सोन्याच्या मिशा अर्पण केल्यात. के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या कुटुंबीयांसह कुरावी वीरभद्रा स्वामी मंदिरात या सोन्याच्या मिशा अर्पण केल्यायत. या मिशांची किंमत 60 हजार रुपये आहे.
तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आपण हे दागिने अर्पण करतोय, असं के. सी. राव यांचं म्हणणं आहे. के. चंद्रशेखर राव यांनीच तेलंगणाच्या निर्मितीची चळवळ अनेक वर्षं चालवली होती. त्याला यश आल्यामुळे मुख्यमंत्री देवस्थानांची यात्रा करतायत. पण असे महागडे दागिने अर्पण केल्यामुळे ते चांगलेच वादात सापडलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा