अशी ही निवडणूक जिथे मुलगा जिंकला आणि आई हरली

अशी ही निवडणूक जिथे मुलगा जिंकला आणि आई हरली

  • Share this:

jalgaon_ladhatराजेश भागवत, जळगाव

 

24 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा परिषदेच्या म्हसावद-बोरनार गटातून पवन भिलाभाऊ सोनवणे (शिवसेना) आणि त्यांची आई लिलाबाई भिलाभाऊ सोनवणे (भाजप) यांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. आई आणि मुलाच्या या लढतीत मुलगा मात्र विजयी झाला आणि आई पराभूत झाली.

जळगाव तालुक्यातील म्हसावद-बोरनार या गटात आई विरुद्ध मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र होते. युती तुटल्याने सोनवणे परिवारात मतभेद होऊन आई आणि मुलगा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत होते. म्हसावद-बोरनार या गटात शिवसेनेकडून पवन सोनवणे यांनी, तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या आई तथा जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या लीलाबाई सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. आई-मुलगा लढतीचे जिल्ह्यातील नव्हे तर कदाचित राज्यातील पहिलेच उदाहरणअसावं असं बोललं जात होतं. या लक्षवेधी लढतीकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष लागून होते  आणि या लढतीत अखेर मुलगा सात हजार मतांनी विजयी झाला आहे. भाजपच्या उमेदवार विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारची सुरुवात या गटातून केली होती. असं असून सुद्धा  भाजपच्या उमेदवाराला अखेर पराभवाचा सामना करावा लागल्याने मुख्यमंत्र्यांची जळगावातील पहिली सभा विफल झाल्याची प्रतिक्रिया  व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.भिलाभाऊ सोनवणे यांच्या लीलाबाई या पत्नी आहेत, तर पवन सोनवणे हे भिलाभाऊंच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव आहेत. एका अर्थाने ही लढत सावत्र आई विरुद्ध मुलगा अशीच होत.  ही लढत लक्षवेधी होणार असल्याने लढतीकडे म्हसावद-बोरनार या गटातील ग्रामस्थाचे लक्ष लागून होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचे नारळ याच गटात फोडून भाजपच्या प्रचाराला सुरवात केली होती. ही जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होती. तरीही भाजपच्या उमेदवाराला या गटात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये लीलाबाई सोनवणे या म्हसावद-बोरनार या गटात गटातून निवडून आल्या होत्या. भिलाभाऊ सोनवणे यांचा राजकीय वारसदार कोण? असा कौटुंबिक वाद या निमित्ताने उफाळून आला होता. असं असताना आता याच गटात आई विरुद्ध मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तालुक्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या भुवऱ्या उंचावल्या होत्या.

"पवनला फूस लावून आमच्या परिवारात फूट पाडायचा विरोधकांचा डाव  आहे. परिवार टिकवण्यासाठी मी पवनला म्हणाले होते की, तू भाजपकडून निवडणूक लढवं, मी माघार घेईन पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी नातं हरलं आणि राजकारण जिंकलं" असं म्हणत लिलाबाई सोनावणे यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.

यावर त्यांचा मुलगा पवन सोनावणे म्हणता,  एकाच  घरात एकीकडे आईचा पराभव आणि माझा विजय म्हणजे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू अशी प्रतिक्रिया त्याने आयबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading