रत्नागिरी जि.प.वर सेनेचा भगवा फडकला, भाजप भुईसपाट

  • Share this:

SHIVSENA BJP FLAG24 फेब्रुवारी : राज्यात सर्वत्र भाजपचा डंका वाजत असताना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपाची धूळधाण झालीय.

55 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपाला एकही जागा निवडून आणता आलेली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही झालेल्या या दारुण पराभवाला भाजपचं स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.

या उलट शिवसेनेनं 39 जागा मिळवत रत्नागिरी जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आणलीय. तर राष्ट्रवादीनंही तब्बल 16 जागा मिळवत मरगळलेल्या पक्षात जीव आणण्याचा प्रयत्न केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading