'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला परवानगी नाकारली

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला परवानगी नाकारली

  • Share this:

10

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारलीय. हा चित्रपट महिलांच्या बाजूने पूर्ण झुकलेला आहे, असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अलंकृता दास यांनी केलंय आणि प्रकाश झा यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय.

या चित्रपटात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आलीय, असं म्हणत चित्रपटातल्या काही दृश्यांनाही सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतलीय. समाजातल्या एका विशिष्ट गटाच्या संवेदना या चित्रपटामुळे दुखावतील, असंही सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटलंय.

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ही वेगेवगळ्या वयोगटातल्या चार महिलांची गोष्ट आहे. यामध्ये बुरखा हे महिलांवरच्या बंधनांचं प्रतीक आहे.ही बंधनं झुगारणाऱ्या महिलांची ही कहाणी. कोकणा सेन, रत्ना पाठक या अभिनेत्रींच्या यात मुख्य भूमिका आहेत.

मुंबई आणि टोकिओ फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. या महोत्सवांमध्ये या चित्रपटाला स्त्री पुरुष समानतेच्या श्रेणीमध्ये पुरस्कारही मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंजाबमधल्या ड्रग्जच्या समस्येवर आलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. तसंच आता 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाचा वाद सुरू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 07:34 PM IST

ताज्या बातम्या