देशमुखांच्या गडाला भगदाड, लातूरमध्ये 'कमळ' उमलले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 07:35 PM IST

देशमुखांच्या गडाला भगदाड, लातूरमध्ये 'कमळ' उमलले

amit_deshmukh424 फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या गडाला हा मोठा हादरा बसला. गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेवर असलेली काँग्रेसची सत्ता भाजपनं संपवलीये.

जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. मात्र या निवडणुकीत भाजपनं अक्षरशः काँग्रेसला धूळ चारलीय.

या जिल्हा परिषदेतील ३६ जागा भाजपनं जिंकून लातूरच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. ५८ पैकी ३६ जागा भाजपने जिंकल्याने या जिल्हा परिषदेत भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध केलंय. तर काँग्रेसला अवघ्या १५ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय.

 २०१७ चा निकाल

* काँग्रेस - १५

Loading...

* भाजप - ३६

* राष्ट्रवादी - ०५

* शिवसेना - ०१

* अपक्ष  - ०१​

 २०१२ चे पक्षीय बलाबल

* सदस्य - ५८

* पक्षीय बालाबल *

* काँग्रेस - ३५

* भाजप - ०८

* राष्ट्रवादी - ०९

* शिवसेना - ०५

* मनसे - ०१​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...