शिवसेनेला बंडोबांसह अपक्ष मिळाला,आकडा 87 वर गेला

शिवसेनेला बंडोबांसह अपक्ष मिळाला,आकडा 87 वर गेला

  • Share this:

shiv-sena24 फेब्रुवारी : मुंबईचा महापौर शिवसेनेचाच बनवण्यासाठी शिवसेननं बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केलीये. शिवसेनेनं शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्षांची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केलीये. महापालिकेत निवडून आलेल्या दोन बंडखोर आणि एका अपक्षाला शिवसेनेला गळाला लावण्यात यश आलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 87 वर गेलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे या दोन सेना बंडखोरांनी आणि चंगेज मुलतानी या अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवलाय. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत अजून विचार केला नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.  शिवसेना संख्याबळ वाढवण्याचा जोरदार प्रयत्न करत असून शिवसेनेचाच महापौर होईल असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 24, 2017, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading