सध्यातरी युतीबाबत विचार नाही; उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 06:16 PM IST

Uddhav thackraydlhajhsd

24 फेब्रुवारी :  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत अजून विचार केला नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे युतीचा प्रश्न सध्या तरी अधांतरीच आहे.

भाजपने राज्यातील 8 महापालिका निवडणुकांत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये भाजपच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, मुंबई महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मुंबई महापालिकांमध्ये शिवसेनेचं बलाबल सर्वाधिक पण स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युती करणार का, असं विचारलं असता युतीचा सध्या तरी विचार केलेला नाही. आता आनंद साजरा करू द्या, आनंदात सहभाही होऊ द्या, असं म्हटलं आहे.

दरम्यान, उद्या शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक ‘मातोश्री’वर जाऊनउद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या बैठकीतच पुढील वाटचाल स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...