तत्वाच्या राजकारणाला शुभेच्छा,सदाभाऊ खोतांचं शेट्टींवर टीकास्त्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 06:25 PM IST

तत्वाच्या राजकारणाला शुभेच्छा,सदाभाऊ खोतांचं शेट्टींवर टीकास्त्र

khot_Vs_rajisheti

24 फेब्रुवारी : राजू शेट्टी हे घराणेशाही विरोधात तत्वांचा राजकारण करता, त्यांनी तसंच तत्वांचा राजकारण आयुष्यभर करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी टीका   कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर केलीये. त्यांच्या टीकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाद चांगलाच चव्हाट्यावर आलाय.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातली दरी आणखी रुंदावलीये. मुलाच्या पराभवानंतर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीकास्त्र सोडलंय. तत्वाचं राजकारण आयुष्यभर करावं याच्या राजू शेट्टींना शुभेच्छा अशा शब्दात सदाभाऊंनी राजू शेट्टींना टोला लगावलाय.

सागर खोत यांच्या उमेदवारीला राजू शेट्टींनी विरोध केला होता. त्यातच सागर यांचा पराभव सदाभाऊंच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे एकेकाळची ही जोडी आता फुटणार का ? असा प्रश्न निर्माण झालाय. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनाही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...