मुंबईच्या एल वॉर्डमध्ये नोटाला 4 हजार मतं

  • Share this:

nota3

24 फेब्रुवारी :  महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुतांश उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ पहायला मिळाली. पक्ष, व्यक्ती, विकासकामे अशा अनेक विषयांवर विचार करून मतदार राजाने उमेदवारांच्या पारड्यात मतं टाकली. मात्र, दुसरीकडे एकही उमेदवार योग्य न वाटल्यानं हजारो नागरिकांनी ‘नोटा’ अर्थात नकाराधिकार वापरला. मुंबईतील कुर्ला इथल्या  एल प्रभागात 4 हजार 19 मतदारांनी 'नोटा' वापरला आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणूकीनंतर महापालिका निवडुकीत यंदा पहिल्यांदाच 'नोटा'चा पर्याय उपल्बध करून दिला होतो. कोणताही उमेदवार लोकनेता होण्याच्या पात्रतेचा नाही, असं वाटल्यास नागरिकांना नोटाचा पर्याय वापरता येतो.

त्याप्रमाणे, महानगरपालिका निवडणुकीत हजारो मतदारांनी ‘नोटा’ वापरल्याने उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक पडला. या पर्यायामुळे अनेकांची मतांची समीकरणं बिघडली आहेत.

निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मला हवा तसा नाही, असं मत व्यक्त करण्यासाठी नोटा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच अधिकाराचा महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात वापर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading