24 फेब्रुवारी : महापालिका निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सेना-भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या होत्या. त्यामुळे युतीचे काय होईल? शिवसेनेच्या वक्तव्यांचा कसा असर झाला, भाजपच्या पारदर्शकातेचा मुद्दा, किंवा तुमच्या राजाला साथ द्या, असो.. असे एक ना अनेक जोक्स सोशल मीडियावर फिरत आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकांचं निकाल काल समोर आले. कोणाला विजयाचा धक्का मिळाला तर कोणाला धक्कादायक पराभवाचा समना करावा लागला. यात शिवसेना आणि भाजपामध्ये खूपचं चुरस पाहायला मिळाली. पण निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिवार जोक्सची जणू काही लाटच आली...
सोशलकल्लोळ
कोणाला मत द्यायचं हे आधीच ठरल्यामुळे कशाला उगाच सभेला जायचं? तेही दुपारी १ ते ४ मध्ये..!
पुणेरी पाटी
ढोकळा ८२ (बीजेपी)
पास्ता ३१ (काँग्रेस)
गण्णा ९ (राष्ट्रवादी)
खाली पाव ७ (मनसे)
भेळ १४ (अन्य)
मुंबईकर तृप्त....
राजाला 7 द्या 7 च दिले
आमदार कि ला बोलले-
ऐकला चलो रे तर 1 च आला किती प्रेम मराठी माणसाचे
निवडणुकीचा निकाल लागला
तुला ८१ मला ८४
बघ माझी आठवण येते का??
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा