रावसाहेब दानवे म्हणतात, 'राजकारणात कुणी शत्रू नसतो'

रावसाहेब दानवे म्हणतात, 'राजकारणात कुणी शत्रू नसतो'

  • Share this:

news_room_charcha424 फेब्रुवारी : 'राजकारणात कोणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नाही' मुंबईत पुन्हा युती करायची की नाही याच्या निर्णय आमच्या कोअऱ कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विजयासाठी पडद्यामागच्या भूमिकांचा खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. आणि योग्य नियोजन, पारर्दशक कारभाराच्या बळावर आम्ही हा विजयी होऊ शकलो. राज्य भरात भाजपचा आलेख उंचावलाय. या निवडणुकीत भाजपची 207 टक्के वाढ झाली असं रावसाहेब दानवेंनी आ म्हणाले.

'...तर काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटेल'

मुंबईत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. बहुमतासाठी जर सेना-काँग्रेस एकत्र आले तर काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटेल अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली.

'युती पारदर्शकतेच्या मुद्यावर तुटली'

जर आमची ताकद वाढली असेल तर आम्ही जास्त जागा मागणारच पण, सेनेच्या नेत्यांनी आमची ताकद कमी आहे असं म्हणून हिणावलं. मुळात युती तुटली ती पारदर्शकतेच्या मुद्यावर.. त्यांनी पारदर्शकतेला नकार दिला आणि युती तोडण्याचा निर्णय घेतला. आणि आज निकालातून तर स्पष्टच झालंय. की ताकद कुणाची वाढली आहे असा टोला दानवेंनी लगावला.

'महापौर हा भाजपचाच'

आता मुंबईत युती करणार का ? असा सवाल विचारला असता रावसाहेब दानवे म्हणाले की, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. शिवसेना आणि भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा एकच आहे. पण, युती जर करायची असेल तर याबद्दल आमची एक कोअऱ कमिटीची बैठक आहे. या बैठकीची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत याबद्दल निर्णय घेतला जाईल. पण महापौर हा भाजपचाच असेल असंही दानवेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 03:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading